Today’s Horoscope 12 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 12 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 12.02.2024.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – तिलकुंद चतुर्थी.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00 .

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा 14.57 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा.

चंद्र राशी – कुंभ 9.36 पर्यंत नंतर मीन.

—————————–

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)

दिवस खर्चाचा असल्याने आज बचत शक्य नाही. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. अनावश्यक खरेदी ही कराल. प्रवासात एखादी चीज वस्तू गाळ होऊ शकते, सतर्क रहा.

वृषभ –  ( शुभ रंग- चंदेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र दिलेले शब्द पाळतील. दिवसाच्या पूर्वार्धात लाभ होईल.

मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्याला प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात प्रगतीची चक्रे गतिमान राहतील. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील.

कर्क – ( शुभ रंग – मरून)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्रीच बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. वडीलधाऱ्यांचा मान राखाल.

सिंह -( शुभ रंग – गुलाबी)

हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतात. कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कोणतेही गैरवर्तन करू नका.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज तुमच्या कार्यक्षेत्रातही आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची तुम्हाला खंबीर साथ राहील.

तूळ – ( शुभ रंग- भगवा)

कोणतीही गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

वृश्चिक-  ( शुभ रंग – लाल)

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

धनु – (शुभ रंग- मोतिया)

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे तुम्हाला गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे हिताचे राहील. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

मकर – (शुभ रंग- आकाशी)

शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन संबंध सुधारतील. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवा. आईच्या आज्ञेत रहा.

कुंभ – (शुभ रंग- निळा)

वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल.

मीन – ( शुभ रंग- राखाडी)

आज अति उत्साहाने तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. उपवारांना सुयोग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.