Today’s Horoscope 12 January 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग –  वार  मंगळवार. ​दि​. 12 जानेवारी 2021

 

  • शुभाशुभ विचार – कृ. चतुर्दशी.
  • आज विशेष – दर्श अमावस्या.
  • राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र –  मूळ 07.38 पर्यंत नंतर पूर्वाषाढा.
  • चंद्र राशी – धनु.

 

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – निळा)
कार्यक्षेत्रात अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. आज तुम्हाला थोडी एकांताची गरज भासेल. सत्संगाकडे पावले आपोआप वळतील.

वृषभ – (शुभ रंग – पिस्ता)

शुल्लक कारणाने घरातील थोरांशी मतभेद संभवतात. नोकरदारांनी आज नोकरीच्या ठिकाणी झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. प्रतिष्ठेची काळजी घ्या. नवीन ओळखीत व्यवहार नकोत.

मिथुन – (शुभ रंग – हिरवा)
व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध राहतील. वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील आशादायी दिवस.

कर्क – (शुभ रंग – गुलाबी)
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे कुसंगत टाळावी. बेरोजगारांना आज मनाजोगता रोजगार प्राप्त होईल.

सिंह – (शुभ रंग – लाल)
नवोदित कलाकारांना पूर्वीच्या उमेदवारीचे फळ मिळेल भाग्यवान महिला मौल्यवान खरेदी करतील. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

_MPC_DIR_MPU_II

कन्या – (शुभ रंग – मोतिया)

आज प्रॉपर्टीविषयी काही व्यवहार मार्गी लागतील. प्रेम प्रकरणात मात्र नसती आफत होईल, सांभाळा. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल.

तुळ – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज भावंडात सलोखा राहील. अधिकारी वर्गाने कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे.

वृश्चिक – (शुभ रंग – आकाशी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. अचानक आलेल्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. प्रवासात दगदग होईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस.

धनु – (शुभ रंग – भगवा)

अति स्पष्टवक्तेपणामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवला तर अनेक क्‍लिष्ट कामे सोपी होतील. अति आक्रमकतेने घेतलेले निर्णय मात्र चुकण्याचीच शक्यता जास्त.

मकर – (शुभ रंग – जांभळा)

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त आज बरीच पायपीट होणार आहे. गृहिणींनी आज झाकली मूठ झाकली ठेवलेली बरी.

कुंभ – (शुभ रंग – नारिंगी)

सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल. तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील, विरोधकही आज शरण येतील.

मीन – (शुभ रंग – मरून)

यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्या ही महत्वाकांक्षा वाढतील. मान सन्मानात वृद्धि होईल. घरगुती गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. आज जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.