Today’s Horoscope 12 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 12 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

12.03.2023.

 शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.

 आज विशेष- रंगपंचमी.

 राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00.

 दिशा शूल – पश्चिमेस असेल.  आजचे नक्षत्र – स्वाती 08.00  पर्यंत नंतर विशाखा.

 चंद्र राशी – तुळ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- निळा )

नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण कितीही वाढला असला तरीही वरिष्ठांचे ही सहकार्य राहील. आज जोडीदाराकडूनही तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील काही शुभ समाचार येतील.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

नोकरदारांना वरिष्ठ आज गोड बोलून राबवून घेतील. काही आरोग्यविषयक समस्यांवर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कुणाला सल्ले देऊच नका.

मिथुन ( शुभ रंग- गुलाबी )

आज तुमच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कमी श्रमात जास्त लाभाची स्वप्ने पहाल. आज तुम्ही हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्याल. सामान्य दिवस.

कर्क (शुभ रंग- लेमन.)

बरेच दिवसापासून रेंगाळलेल्या घरगुती कामात आज लक्ष देणे गरजेचे वाटेल. गृह उद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत चांगली राहील. मुले मन लावून अभ्यास करतील.

सिंह (शुभ रंग- हिरवा)

आज प्रत्यक्ष कृतीपेक्षा रिकामटेकड्या गप्पात तुमचा बराच वेळ फुकट जाईल. सामाजिक कार्यकर्ते गरजूंच्या कामी येतील. आज शेजारी आपलेपणाने डोकावतील.

कन्या ( शुभ रंग-डाळिंबी )

धनस्थानातील चंद्रभ्रमण तुमची आर्थिक मिळकत वाढवेल. कुटुंबियांचे वाढते हट्ट हौशीने पुरवाल. गृहिणींना आज अनपेक्षितपणे येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल.

तूळ ( शुभ रंग- पांढरा )

आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यास प्राधान्य द्याल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा अट्टहास असेल. तरी महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय अनुभवींच्याच सल्ल्याने घ्या.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमा खर्चाची गणिते बिघडतील. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येणार आहे. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. प्रवास घडतील.

धनु- (शुभ रंग- मरून )

लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा पूर्ण करेल. मुला-मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज शुभ चिंता म्हणजे शुभच घडेल. वाडीत गोडवा असू द्या.

मकर ( शुभ रंग- गुलाबी)

मित्र मंडळींना दुरूनच रामराम करून आज आपल्या ध्येयप्राप्तीस तुम्ही प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व सिद्ध कराल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

कुंभ (शुभ रंग – राखाडी )

महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत ठरू शकते. कायद्याची चौकट मोडणे महागात पडेल. नाका समोर चालणे हिताचे.

मीन -(शुभ रंग – आकाशी )

कमी श्रमात जास्त लाभाची अपेक्षा करून चालणार नाही. विश्वासू मित्रांकडूनही दगा फटका होऊ शकतो, सतर्क रहा. आज गाडी चालवताना गाणी गुणगुणू नका.

शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.