Today’s Horoscope 14 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 14 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

14.07.2023.

शुभाशुभ विचार – 19 पर्यंत चांगला.

आज विशेष- सामान्य दिवस.

राहू काळ – सकाळी 10.30  ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – रोहिणी 22.27 पर्यंत नंतर मृग.

चंद्र राशी – वृषभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज वाणीत गोडवा ठेवून तुम्ही विरोधकांनाही आपलेसे कराल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज तुमचे मनोबल उत्तम असेल.

वृषभ (शुभ रंग- हिरवा )

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडू शकाल. आज महत्त्वाच्या चर्चेत मात्र इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या.

मिथुन ( शुभ रंग- मरून )

आज घरात वडीलधाऱ्यांचे मूड सांभाळावे लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

कर्क (शुभ रंग- भगवा)

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली करायला हव्यात. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत होऊ शकतो. जेष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडून देऊ नये.

सिंह (शुभ रंग- राखाडी )

नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे तुम्हाला अवघड होईल.

कन्या ( शुभ रंग- पिस्ता )

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली करा आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत होऊ शकतो ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडून देऊ नये.

तूळ ( शुभ रंग- क्रीम)

कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागू शकते.

वृश्चिक (शुभ रंग- निळा)

आज तुमचा कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या कामातील समर्पणाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदाराशी आज चांगले सूर जुळतील.

धनु- (शुभ रंग- सोनेरी)

आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील. काही जुनी दुखणे डोके वर काढण्याची शक्यता आहे. येणी असतील तर ती अनपेक्षित पणे आज वसूल होतील. प्रवासात सावध राहायला हवे.

मकर ( शुभ रंग- आकाशी )

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येतील. एकतर्फी प्रेमाला समोरच्या पार्टीकडून होकार मिळेल.

कुंभ (शुभ रंग – लाल)

शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. नवोदित कलाकारांना यश सोपे नाही, स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.

मीन -(शुभ रंग- मोरपंखी)

कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आज जरा आईच्या तब्येतीची विचारपूस नक्की करा.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.