PCMC : नाट्यगृहांच्या भाडेवाढीच्या संदर्भात लवकरच बैठक – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व नाट्यगृह यांच्या भाडेवाढीच्या संदर्भात लवकरच प्रशासनासोबत बैठक घेण्याचे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले असल्याचे भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी सांगितले.

Alandi : कामिका एकादशी निमित्त माऊलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा

महापालिकेने नाट्यगृहाच्या भाड्यात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे कलाकारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ही भाडेवाड कमी करावी म्हणून गोरखे यांनी वेळोवेळी
प्रशासनास निवेदने दिली होती. परंतु तरी देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून नाट्यगृहांची भाडेवाढ केली आहे.

पूर्वी नाट्यगृहांची जे दर आकारले जात होते. त्या पेक्षा तिप्पट ते चार पट जास्त दर आकारले जात आहेत. या परिस्थितीत साहित्यिक व कला प्रेमी नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करून देखील या विषयी समाधान होत नव्हते. त्यामुळे गोरखे यांनी पालकमंत्री पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या विषयी निवेदन दिले.

लवकरच पालकमंत्री पाटील हे संबंधित विषयांची माहिती घेऊन अधिकारी यांच्या सोबत बैठक लावतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. जो पर्यंत नाट्यगृहांची भाडेवाढ कमी होणार नाही तो पर्यंत या विषयी पाठपुरवठा केला जाईल, अशी माहिती गोरखे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.