PMPML : उद्यापासून पीएमपीएमएलमध्ये काढता येणार कॅशलेस तिकीट; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

एमपीसी न्यूज – उद्यापासून पीएमपीएमएलमध्ये (PMPML) कॅशलेस तिकीट सुविधा सुरु करण्यात येणार आहे. या सुविधेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरुड आगारात होणार आहे. या सुविधेमुळे प्रवासी क्यूआर कोडद्वारे तिकीट काढू शकणार आहेत.

वाहकाच्या ई – तिकीट मशीनमध्ये तिकीट रक्कमेचा क्यू-आर कोड स्कॅन करून युपीआय द्वारे पेमेंट करता येणार आहे. कॅशलेस पेमेंट सुविधेमुळे ज्या जुन्या सुविधा चालू आहेत त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. महामंडळामध्ये 2015 पासुन ई –तिकीट मशीन मधून तिकीट प्रणाली सुरु करण्यात आलेली होती.

परंतु डिजिटल पेमेंट सुविधा प्रवाशांकरिता सुरु करणे प्रलंबित होते. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार 3 सप्टेंबर रोजी महामंडळाकडील ई – तिकीट मशीनची सेवा पुरविणारी कंपनी .ईबिक्स कॅश व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याशी मिटींग घेतली.

महामंडळातील ई- तिकीट मशीन्स मधून डिजिटल पेमेंट सुविधा सुरु करणेबाबत संबंधितांना आदेशित केले होते. त्याला अनुसरून सदर प्रणाली विषयी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत बाणेर आगारामध्ये यशस्वी प्रायोगिक तत्वावर चाचणी घेतली आहे.

Chinchwad : सामाजिक बांधिलकी जपत प्रेषित महमद पैगंबरांची जयंती उत्साहात साजरी

त्यानुसार उद्या कोथरूड आगारात दुपारी बारा वाजता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या व महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत महामंडळाच्या ई – तिकीट मशीन मध्ये तिकीट काढून कॅशलेस पेमेंट सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

यूपीआय पेमेंट मुळे प्रवाशांना व महामंडळाला होणारे फायदे

1. तिकीट घेण्यासाठी सुट्या पैशांची समस्या संपुष्ठात येणार आहे.
2. वाहकाकडील कॅश व्यवहार कमी होऊन कामाची गतिशीलता वाढणार आहे. (PMPML)
3. महामंडळाकडील कॅश व्यवहार कमी होऊन बँकेत पैसे तत्काळ जमा होणार आहेत.
4. लवकरच महामंडळाचे मोबाईल अॅपद्वारे बस ट्रॅकिंग, प्रवासाचे नियोजन व मोबाईल तिकिट सुविधा
महामंडळाकडून सुरु करण्यात येणार आहे.
5. डिजिटल इंडिया या संकल्पनेला हातभार.

या पद्धतीने होणार कॅशलेस पेमेंट

1. वाहकाकडे ऑनलाइन क्युआर कोडची मागणी करणे.
2. क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करणे.
3. वाहकाकडून निर्माण होणारे आपले तिकीट प्राप्त करणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.