Chinchwad : सामाजिक बांधिलकी जपत प्रेषित महमद पैगंबरांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज –  अनंत चतुर्थी आणि महमद पैगंबर जयंती एकत्र आल्याने सामाजिक बांधिलकी जपत दोन दिवसांनी महमद पैगंबरांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.

पिंपरी, चिंचवड आणि शहरात ठीकठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून महमद पैगंबर यांची मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली. चिंचवड स्टेशन येथील जामिया गोसिया मशीद पासून ते निगडी मार्गे आंबेडकर चौक पिंपरी अशी भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली होती.

Pune : पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर कुरीयर घेऊन जाणाऱ्या गाडीला आग; गाडी जळून खाक

यावेळी मिरवणुकीमध्ये लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सामाजिक एकतेचे संदेश दिले. तसेच महमद पैगंबरांनी सर्व मानवजातीला दिलेला मानवतेच्या संदेशाचे स्मरण करण्यात आले. दरम्यान, महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध सेवा पुरविण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.