Maharashtra : मुंबई, कोकण पदवीधर तर मुंबई, नाशिक विभागात शिक्षक मतदार नोंदणीला सुरुवात

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये (Maharashtra) पदवीधरांचे आणि शिक्षकांचे प्रतिनिधी पाठविण्यासाठी वेळोवेळी मतदार नोंदणी केली जाते. मुबई आणि कोकण विभागातील पदवीधर मतदार नोंदणी तसेच मुंबई आणि नाशिक विभागातील शिक्षक मतदार नोंदणी आजपासून सुरु झाली आहे. संबंधित विभागातील पदवीधर आणि शिक्षकांनी मतदार नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

ही नोंदणी 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर आणि 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 79 एवढी आहे. त्यापैकी मुंबई विभाग, अमरावती विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, आणि पुणे विभाग अशा क्षेत्रातून पदवीधरांचे 7 आणि शिक्षकांचे 7 असे एकूण 14 सदस्य निवडून दिले जातात. त्यासाठी वेळोवेळी मतदार नोंदणी करण्यात येते.

PMPML : उद्यापासून पीएमपीएमएलमध्ये काढता येणार कॅशलेस तिकीट; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे – Maharashtra 

1) रहिवासी पुरावा मतदार ओळखपत्र /आधार कार्ड,/ पासपोर्ट/ वाहन चालक परवाना/ वीज-पाणी-गॅस जोडणीचे देयक पत्र (यापैकी एक)

2)विदयापीठ अथवा संबंधित संस्था यांनी दिलेले पदवी प्रमाणपत्र/ गुणपत्रिका / समकक्ष पदवी प्रमाणपत्र यापैकी एक

3) कागदपत्रात नावात बदल असल्यास राजपत्र/ विवाह नोंदणी प्रमाणपत्र/ संबंधित कायदेशीर पुरावा यापैकी एक.

त्यासोबतच कागदपत्रांची प्रत स्वयंसाक्षांकीत करून जोडावे. तसेच मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. 18 भरावे. अर्ज क्र. 18 तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर देखील अर्ज क्र. 18 उपलब्ध करून देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.