Today’s Horoscope 15 August 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – 15 ऑगस्ट 2021, वार – रविवार
शुभाशुभ विचार – आनंदी दिवस.
आज विशेष – स्वातंत्र्य दिन.
राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – विशाखा.
चंद्र राशी – तूळ 22.46 पर्यंत नंतर वृश्चिक.
————————————

आजचे राशिभविष्य

मेष – (शुभ रंग- क्रीम)

नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. तब्येतही जरा नरमच राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना घडतील. पत्नी आज महत्त्वपूर्ण सल्ले देईल.

वृषभ -(शुभ रंग- मरून)

नवीन ओळखीतून व्यवसायात वृद्धी होईल. विरोधकांशी धूर्तपणे वागून स्वतःचा स्वार्थ साधून घ्याल. तब्येतीच्या बाबतीत पैशाची काटकसर करून चालणार नाही. पत्नीचे मूड सांभाळावे लागतील.

मिथुन – (शुभ रंग- हिरवा)

कुटुंबीयांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. मुले आज अभ्यासास प्राधान्य देतील. नवीन कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

कर्क -(शुभ रंग – पांढरा)

कोर्टकचेरीची कामे पुढे सरकतील. शेजाऱ्यांकडून काही सुवार्ता येतील. आज आईच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. आज परिवारास पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

सिंह- (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. वेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कठोरपणे बोलून कोणाचे मन दुखवू नका.

कन्या – (शुभ रंग – पिस्ता)

आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. विरोधक तुमच्या चुका काढतील. संयम ढळू  देऊ नका. पत्नी आज योग्य तेच सल्ले देणार आहे. शेजारी जरा कुत्सित नजरेने बघतील.

तूळ – (शुभ रंग – मोतिया)

उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्वीकारावी लागेल. खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. काहीजणांना अचानक प्रवासास निघावे लागेल. जोडीदाराशी एकमत राहील.

वृश्चिक- (शुभ रंग- सोनेरी)

कंजूष पणा सोडून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. कर्ज हप्ते भरावे लागणार आहेत. खर्च वाढता असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. अध्यात्मिक मार्गाकडे वळाल.

धनु – (शुभ रंग -आकाशी)

नोकरीधंद्यात उत्साही दिवस राहील.  योग्य वेळी अधिकार वापरावे लागणार आहेत. प्रतिष्ठितांच्या ओळखी आज कामी येतील.  आज एखाद्या मित्रांस मदत कराल.

मकर – (शुभ रंग- निळा)

दैनंदिन कामातही अडथळे येणार आहेत आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. आज नोकरदारांना जास्त वेळ थांबून काम करावे लागेल

कुंभ (शुभ रंग – लाल)

आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार उद्यावरच ढकलले तर बरे होईल. जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.

मीन – (शुभ रंग – क्रीम)

उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. नोकरदारांना ऑफिसमध्ये साहेबांचे व घरात पत्नीचेही मूड सांभाळावे लागतील. संध्याकाळी सत्संगात रमाल.

!! शुभम भवतु!!

– जयंत कुलकर्णी

फोन 9689165424

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.