Today’s Horoscope 22 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 22 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस- गुरुवार

तारीख – 22.02.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – गुरुपुष्यामृत ( सूर्योदयापासून 16.43 पर्यंत)

राहू काळ – दुपारी 01.30  ते 03.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – पुष्य 16.43  पर्यंत नंतर आश्लेषा.

चंद्र राशी – कर्क.

—————————–

मेष – ( शुभ रंग – आकाशी)

मुलांची शाळेतील कामगिरी कौतुकास्पद राहील. पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज घरातच सापडण्याची शक्यता आहे. आज तुम्ही मुलांचे लाड हौशीने पुरवाल.

वृषभ – ( शुभ रंग- गुलाबी)

आज घराबाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण असू द्या. व्यर्थ वाद टाळा. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. अहंकार काही कामाचा नाही.

मिथुन – ( शुभ रंग- क्रीम)

आज अपेक्षेपेक्षा जास्तच काही पदरात पडेल. तुमच्या वक्तृत्वाचा समोरील व्यक्तीवर चांगला प्रभाव राहील. काही येणी असतील तर न मागता वसूल होतील.

कर्क – ( शुभ रंग – अबोली)

आजचा दिवस थोडा धावपळीचा राहील. काम कमी दगदग  जास्त होईल. एखादा विवाह जुळवण्यात तुम्ही यशस्वी मध्यस्थी कराल. जमाखर्चाचा तराजू समतोल राहीलच.

सिंह -( शुभ रंग – पिस्ता)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक मनाजोगती असली तरीही आज अनावश्यक खर्च टाळायला हवेत. दुरचे नातलग आज संपर्कात येतील. प्रवास घडतील.

कन्या – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे. आज जे काही पदरात पडेल ते पात्रतेपेक्षा थोडं तरी जास्तच असेल. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला.

तूळ – ( शुभ रंग- जांभळा)

आज भावने पेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणे योग्य ठरणार आहे. अधिकारी वर्गावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल. किरकोळ तब्येतीच्या तक्रारीही दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

वृश्चिक- ( शुभ रंग – निळा)

सहजच काही नाही मिळाले तरीही आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ उत्तमपणे मिळेल सज्जनांचे पाय घराला लागतील आज वडीलधाऱ्यांच्या वयाचा मान राखा.

धनु – (शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात सतत सावधानता बाळगा. काही चुकीची माणसे संपर्कात येतील. कमी श्रमात जास्त लाभाचा मोह टाळा. आज कोणतेही धाडस नको. नाका समोर चाला.

मकर – (शुभ रंग- लाल)

कौटुंबिक सदस्यात सामंजस्य राहील. जोडीदाराला अभिमान वाटण्याजोगी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायातील स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. हितशत्रूंचा उपद्रव चालूच राहणार आहे. कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्या. तब्येत आज थोडी नरम असेल.

मीन-  ( शुभ रंग- मोरपंखी)

काही रसिक व हौशी मंडळी आज कामावर दांडी मारून मौज मजेला प्राधान्य देतील. स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.