Todays Horoscope 27 February 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ
आजचे पंचांग – वार रविवार, दि. 27.02.2022
- शुभाशुभ विचार – क्षयदिन.
- आज विशेष – भागवत एकादशी.
- राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00.
- दिशा शूल – पश्चिमेस असेल.
- आजचे नक्षत्र – पूर्वाषाढा 8.49 पर्यंत नंतर उत्तराषाढा.
- चंद्र राशी – धनु- दुपारी 14.22 पर्यंत नंतर मकर.
—————————————-
आजचे राशीभविष्य –
मेष – (शुभ रंग – राखाडी )
व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे आहे. काही निर्णय आज झटपट घ्यावे लागणार आहेत आलेली कुठलीच संधी सोडू नका. मित्रमंडळींना आज दुरूनच राम राम करा.
वृषभ – (शुभ रंग- सोनेरी)
वडीलधार्यांशी मतभेद होतील पण तुम्ही त्यांच्या वयाच्या मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी ही नमते घ्यावे लागेल. आज दुपार नंतर काही सज्जनांचा सहवास घडेल.
मिथुन – (शुभ रंग- चंदेरी)
आज उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. महत्वाच्या चर्चा वाटाघाटी उद्यावर ढकलाव्यात.
कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)
बरेच दिवसांनी आज तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असे वातावरण असेल.
सिंह -( शुभ रंग -स्ट्रॉबेरी )
आज तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. भावनेच्या भरात कोणाला शब्द देऊन अडकू नका.
कन्या- ( शुभ रंग- पिस्ता)
काही नव्या ओळखी होतील तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. तुम्हाला एखाद्या नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.
तुळ – ( शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा संघर्ष चालूच राहील.
वृश्चिक- ( शुभ रंग- जांभळा)
आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आज आई बरोबर मतभेद संभवतात. आज दुरावलेले शेजारी मात्र जवळ येतील.
धनु – (शुभ रंग – मोरपिशी)
आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. ठामपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. प्रवासात खोळंबा होऊ शकतो.
मकर- ( शुभ रंग – मरून)
आज हाती पैसा राहील, आवडत्या क्षेत्रात तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आज स्वतःचे लाड पुरवाल. उंची वस्त्र खरेदी कराल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर सापडेल.
कुंभ- ( शुभ रंग- नारिंगी)
आज आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. रिकामटेकड्या चर्चेतून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. एखाद्या समारंभात वावरताना आपले मौल्यवान ऐवज सांभाळा.
मीन – ( शुभ रंग- डाळिंबी)
हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. लघु उद्योजकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.