Pimpri News: महापालिका कर्मचारी संघ निवडणूक! बबन झिंझुर्डे यांचा 9 मतांनी विजय; अंबर चिंचवडे यांचा पराभव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक अतिशय अटी-तटीची झाली. स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलने सत्ता काबीज केली. अध्यक्षपदाचे उमेदवार पॅनल प्रमुख बबन झिंझुर्डे यांनी नऊ मतांनी विजय मिळवला. दहा पदाच्या उमेदवारांपैकी नऊ उमेदवार त्यांचे निवडून आले आहेत. आपला महासंघ पॅनलचे प्रमुख, विद्यमान अध्यक्ष अंबर चिंचवडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या पॅनलमधील  सुप्रिया सुरगुडे या उपाध्यक्षपदी निवडून आल्या. दरम्यान,  कार्यकारिणी सभासदासाठी झालेल्या मतांची मोजणी अद्याप सुरू आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ ही मान्यताप्राप्त संघटना आहे. या संघटनेत सहा हजार 200 सभासद आहेत. कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकारणीची सन 2022 ते 2024 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी शुक्रवारी 13 केंद्रावर मतदान झाले होते. 5 हजार 505 सभासदांनी मतदान केले होते. 87.82 टक्के मतदान झाले होते.  त्याची मतमोजणी कालपासून अद्यापपर्यंत सुरू आहे.

स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे विजयी उमेदवार – अध्यक्ष बबन झिंझुर्डे, उपाध्यक्ष मनोज माछरे, महादेव बोत्रे,   सरचिटणीस अभिमान भोसले, चिटणीस मंगेश कलापुरे, सहसचिव उमेश बांदल, कोषापाल नितीन समगिर, मुख्य संघटक दिगंबर चिंचवडे, संघटक शुभांगी चव्हाण हे विजयी झाले आहेत. तर, पॅनलमधील उपाध्यक्षपदाच्या उमेदवार सविता निगडे यांचा पराभव झाला.

तर, कार्यकारणी सभासदासाठी झालेल्या मतांची अद्याप मतमोजणी सुरू आहे.  स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे कार्यकारणी सभासदासाठी  लाला गाडे, दत्तात्रय ढगे, विजेंद्र आठवाल, अमित सारसर, संजीव राक्षे, चंद्रशेखर गावडे, संजय कापसे, अण्णा वाघेले, तुषार कस्पटे, प्रमोद आंबपकर, विशाल बाणेकर, सुरज टिंगरे, धर्मेंद्र शिंदे, नंदकुमार इंदलकर आणि माया वाकडे हे उमेदवार आहेत.

आपला महासंघ पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार अंबर चिंचवडे, उपाध्यक्ष संपत पानसरे, बाळासाहेब कापसे, सरचिटणीस सुरेश गारगोटे, चिटणीस योगेश रसाळ, सहसचिव कविता सातपुते, कोषापाल अविनाश ढमाले, संघटक उद्धव डवरी, प्रमुख संघटकपदाचे उमेदवार मदन चिंचवडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर, कार्यकारिणी सभासद विकास काळजे, रुपाली कड, निलेश घुले, योगेश रेणवा, चंद्रकांत चव्हाण, गणेश राजगे, चेतन कांबळे, गोरख भालेकर, बाळू साठे, नारायण जायभाय, अमित जाधव, फिरोज सय्यद, मिलिंद काटे, राजेश चव्हाण आणि विक्रम लांडगे यांची मतमोजणी अद्याप सुरू आहे.

”महापालिकेतील कर्मचा-यांनी 20 वर्षे मला साथ दिली. पण, मागील काळात विरोधकांनी खोटे नाटे आरोप केले. मागील परावभही मी खेळीमेळीच्या वातावरणात स्वीकारला होता. मागीलवेळी झालेली चुक कर्मचा-यांच्या लक्षात आली. त्यामुळे यावेळी त्यांनी पुन्हा मला साथ दिली. आरोग्य विभागातील कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने मतदान केले. मागील दोन वर्षात महापालिका कर्मचा-यांचे नुकसान झाले. ते भरुन काढणार आहे. महापालिका कर्मचा-यांचे मनापासून आभार मानतो” अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष  बबन झिंझुर्डे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.