Today’s Horoscope 3 September 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग, गुरुवार दि​ . 3 ​​सप्टेंबर ​2020

शुभाशुभ…शुभ दिवस!

  • आज विशेष – द्वितीया श्राद्ध.
  • राहूकाळ – दुपारी 01.30 ते 03.00
  • दिशा शूल – दक्षिणेस असेल
  • नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा 20.51 वाजेपर्यंत. नंतर उत्तरा भाद्रपदा.
  • आजची चंद्र राशि – 14.15 वाजेपर्यंत कुंभ, नंतर मीन.

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभरंग- राखाडी) रिकामटेकड्या चर्चेत व वाद विवादात वेळ फुकट जाईल. त्यामुळे महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. खर्च आवाक्‍याबाहेर जाईल.

वृषभ – ( शुभ रंग – केशरी) चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षिताना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील.

मिथुन – ( शुभरंग- चंदेरी ) अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरू राहील. नोकरदारांना वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. व्यस्त दिवस.

कर्क – ( शुभरंग- मोतिया) नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण राहील. काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी नमते घेतलेले बरे.

सिंह – ( शुभ रंग- मोरपंखी ) हाऊस मौज करतानाही आपल्या मर्यादा सांभाळा. तरुणांनी कुसंगती पासून लांब राहावे. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे.

कन्या –( शुभ रंग – हिरवा) काही मनासारख्या घटनांनी तुमचा उत्साह वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंगांना सहज तोंड द्याल. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील.

तूळ –( शुभरंग- पिस्ता) काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील पथ्यपाणी पाळा अन्यथा आजार बळावण्याची शक्यता आहे. येणी वसूल होऊ शकतील.

वृश्चिक –( शुभ रंग- निळा) महत्त्वाच्या कामांना आज विलंब होणार आहे बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका.

धनु –( शुभ रंग- भगवा) कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. आपले आवडते छंद जपण्यास वेळ द्याल. कलावंतांनी प्रयत्न वाढवायला हवेत.

मकर –( शुभ रंग- गुलाबी) परिवारातील सदस्यांच्या मागण्या पूर्ण करताना नाकी नऊ येतील.  शेजारी आपलेपणाने डोकावतील. मोठ्या आर्थिक उलाढाली सावधपणे करा.

कुंभ – ( शुभ रंग- आकाशी) अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील.

मीन – ( शुभ रंग- पांढरा ) कार्यक्षेत्रात अति आक्रमकतेने नुकसान होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांची ही मते विचारात घ्यायला हवीत. पत्नी आज योग्यच सल्ले देईल.

 

श्री. जयंत कुलकर्णी
फोन. 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.