Today’s Horoscope 31 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 31 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 31.12.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – मघा.

चंद्र राशी – सिंह.

—————————–

मेष – ( शुभ रंग – केशरी)

महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. आज मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. रुग्णांना असाध्य आजारावर योग्य डॉक्टर सापडतील.

वृषभ – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. मुलांचे अति लाड नकोत. आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील.

मिथुन – ( शुभ रंग- राखाडी)

नोकरीच्या ठिकाणी कामातील समर्पणाचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी तुमच्या हातून होईल.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज लहान भावास कदाचित तुमच्या मदतीची गरज भासू शकेल.

सिंह – ( शुभ रंग – सोनेरी)

आज तुम्ही हट्टीपणाने वागाल. सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली असली तरीही पैशाची उधळपट्टी नको.

कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)

आज विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. आज विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील.

तूळ- ( शुभ रंग- निळा)

आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र दिलेली आश्वासने पाळतील महत्त्वाची आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकणे गरजेचे आहे.

वृश्चिक- ( शुभ रंग – लाल)

उच्चशिक्षित मंडळींना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील. छान दिवस.

धनु – (शुभ रंग- आकाशी)

ऑफिसमध्ये अधिकारी वर्गाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

मकर- ( शुभ रंग – भगवा)

कार्यक्षेत्रात घडलेल्या काही मनाविरुद्ध घटनांनी बेचैन व्हाल. आज वरिष्ठांशी नमते घ्या आणि सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. वाहन चालवताना ओव्हरटेक करू नका.

कुंभ – (शुभ रंग- मोरपंखी)

आज आपल्या मर्यादेत रहा. अति आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे. पालक हिताचे सल्ले देतील.

मीन – ( शुभ रंग- पिस्ता)

कार्यक्षेत्रात काही आव्हान देणारे पेच प्रसंग सोडवावे लागतील. वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद राहतील. भागीदारीत आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात करावेत.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.