Yerawada : 10 लाखांची रोकड लुटून पळून जाणा-या तिघांना वाहतूक पोलीस व बीट मार्शलने पकडले

एमपीसी न्यूज – डेली कलेक्शन एजंटवर पाळत ठेवून त्याच्या जवळील 10 लाख रुपयांची रकम लुटून पळून जाणा-या तिघा चोरट्यांना वाहतूक पोलीस व बीट मार्शलने पाठलाग करून पकडले. ही घटना आज (सोमवार) दुपारी साडेचारच्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम ब्रिज येथे घडली.  

याप्रकरणी अभिनव खेसे यांनी फिर्याद दिली. तेजस पाटोळे, महेश पाटोळे ओमकार उत्तेकर अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिंग इंडिया फायनांन्स कंपनीत खेसे डेली कलेक्‍शनचे काम करतात. ते व्यापारी व फायनान्स कंपनीच्या इतर ग्राहकांचे हप्त्याचे पैसे गोळा करुन कंपनीत देण्याचे काम करतात. यानंतर कंपनी हे पैसे बॅंकेत भरते. दुपारी साडेचारच्या सुमारास ते दुचाकीवरुन जमलेली दहा लाखाची रोकड घेऊन चालले होते. त्यांच्यावर पाळत ठेवून तिघा आरोपींनी त्यांना गाठत दमदाटी करून पैशाची बॅग हिसकावली.

ही बॅग घेऊन पळत जात असताना खेसे यांनी आरडाओरडा केला. हे ऐकूण चौकातील वाहतूक पोलीस, जवळून जाणारे बीट मार्शल आणि इतरांनी आरोपींचा पाठलाग करत त्यांना पकडून बेड्या ठोकल्या. दरम्यान, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोकड लूटण्याची मागील काही महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.