Pune : ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंग मागील रस्त्यावर हॅण्डग्रेनाईड सदृश वस्तू सापडल्याने खळबळ

पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने स्फोट घडवून वस्तू केली निकामी

एमपीसी न्यूज – ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे पार्किंगच्या मागील रस्त्यावर एक हॅण्डग्रेनाईड सदृश्य वस्तू सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने स्फोट घडवून ही वस्तू निकामी केली. लष्कराला ही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान नष्ट केलेल्या हॅण्डग्रेनाईड सदृश्य वस्तूचे अंश पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत.

ताडीवाला रस्त्यावर रेल्वे प्रशासनाचे मुख्य कार्यालय आहे. त्या शेजारीच रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाण्यासाठी पादचारी उड्डाणपूल आहे. या पुलाशेजारी असलेल्या पार्किंगच्या मागील रस्त्यावर साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याला हॅण्डग्रेनाईड सदृश्य वस्तू आढळली. त्याने तातडीने याची खबर रेल्वे पोलिसांना दिली. तेथे रेल्वे सुरक्षा बल एएसआय संतोष बडे आणि कॉन्स्टेबल विकास पाटील दाखल झाले. त्यांनी प्रथम श्‍वान पथकाला याची खबर दिली. यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.