Moshi : कोयत्याच्या धाकाने ‘त्रिकुटा’ने दोघांना लुटले

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने कोयत्याचा धाक दाखवत जेवनानंतर शतपावली करणा-या दोघांकडील तीन मोबाईल फोन आणि 15 हजारांची रोकड असा 51 हजारांचा ऐवज लुबाडून नेला. ही घटना सोमवारी (दि.15) रात्री नऊच्या सुमारास मोशीतील सस्तेवाडी येथे घडली.

याप्रकरणी स्वप्निल भानुदास भगत (वय 26, रा. मोशी) याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

स्वप्निल व त्याचा मित्र जेवण झाल्यानंतर सस्तेवाडीतील बीआरटी रस्त्यावर शतपावली करत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका त्रिकुटाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवू त्यांच्याकडील 36 हजार रुपयांचे तीन मोबाईल, 15 हजारांची रोकड असा 51 हजारांचा ऐवज लुबाडून नेला. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.