Pimpri-chinchwad : प्रियकराच्या मित्राकडून मारहाण करत विनयभंग

मोशी येथील घटना

एमपीसी न्यूज – काहीही कारण नसताना  प्रियकराच्या मित्राने तरुणीला मारहाण करत तिचा विनयभंग केला आहे. ही घटना आदर्श नगर, मोशी येथे सोमवारी (दि. 8) घडली.

ऋषिकेश जगताप (वय 25, रा. आदर्श नगर, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 26 वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद (Pimpri-chinchwad) दिली आहे.

Wakad : महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्यास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही सोमवारी आपल्या प्रियकरास भेटण्यासाठी आदर्श नगर, मोशी येथे आली. मात्र प्रियकर घरी नसल्याने तिने प्रियकराला फोन लावून बोलाविले. त्यावेळी प्रियकरासोबत आलेला त्याचा मित्र आरोपी ऋषिकेश याने काहीही कारण नसताना फिर्यादी तरुणीस शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करीत फिर्यादी तरुणीचा विनयभंगही केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.