Moshi News : ज्योती मॅरेथॉनमध्ये धावले अडीच हजार कामगार  

एमपीसी न्यूज – ‘इंडस्ट्रियल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून मोशी येथे  ‘ज्योती इंडस्ट्रियल मॅरेथाॅन’ आयोजित करण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये सुमारे अडीच हजार कामगार धावले.

कामगारांच्या स्वास्थ्य जनजागृतीचे उद्दिष्ट ठेवून आयोजित केलेल्या स्पर्धेला मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे सकाळी साडेपाचला प्रारंभ झाला. त्या पाठोपाठ 10 किमी व 5 किमी स्पर्धा चालू झाल्या. ह्या स्पर्धेत महिला, पुरुष, 45+ महिला व 45+ पुरुष असे विविध गट होते.

21 किमी पुरुष गटात अभिषेक सोनी तर महिला गटात रेश्मा कावते ह्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 10 किमी गटात करण शर्मा तर महिला गटात प्रियांका चावरकर हे विजेते ठरले. 5 किमी गटात गौरव भोसले व महिलांमध्ये विनया मालुसरे ह्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 45+ पुरुष गटात दीपक वाच्छानी, संजीव कुमार व अविनाश माने हे अनुक्रमे 21 किमी, 10 किमी व 5 किमी गटात विजेते ठरले. तसेच 45+ महिला गटात मनीषा अगरवाल व प्रमोदिनी गडकरी ह्यांनी 10 किमी व 5 किमी गटात विजेते पद पटकावले.

बाल धावपटू काव्या देशमुख( वय 8) हिचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. ब्रिजस्टोन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते यांच्या हस्ते झेंडा दाखवून या मॅरेथॉनला प्रारंभ झाला. यावेळी  मुख्य आयोजक क्रिएटिव्ह कंपोनंटचे संचालक सुभाष जयसिंघानी,रवी हिरेमठ, गुलमोहर चे संचालक अंकाजी पाटील, ज्योती सोल्यूशन्स वर्क्सचे संचालक नित्यानंद थेवर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा दरवर्षी कामगार दिनी भरवण्याचा निश्चय इंडस्ट्रिअल स्पोर्टस् असोसिएशन चे  नित्यानंद थेवर यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी ही स्पर्धा अनेक शहरांमध्ये भरवण्याचे प्रयोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.