Talegaon Dabhade News : रमजाननिमित्त इंदोरीत राष्ट्रवादीकडून इफ्तार पार्टीचे आयोजन

एमपीसी न्यूज – जामा मस्जिद इंदोरी येथे रमजाननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इंदोरी यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी मावळ तालुका राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, मावळ तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष बाबाभाई मुलाणी, माजी नगरसेवक आयुब सिकिलकर, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विट्ठलराव शिंदे,राज खांडभोर,दिलीप ढोरे,जयंत राऊत,प्रशांत भागवत,मनोहर काशिद, दामोदर शिंदे,बबनराव ढोरे, अरविंद शेवकर,रमेश घोजगे, अंकुश ढोरे, आशिष ढोरे व स्वप्निल शेवकर उपस्थित होते.

तळेगांव माजी नगरसेवक आयुब सिकिलकर व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षगणेश खांडगे यांनी सर्व मुस्लिम समुदायाला मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रियाज तांबोळी व विशाल पवार यांनी केले. इन्दोरी गावातील सर्व मान्यवर इफ्तार पार्टीला उपस्थित होते.

इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे नियोजन सलीम मुलानी, अब्दुल मुलानी, तौसिफ मुलानी, मुन्नवर इनामदार,इक्बाल शेख,रमजान तांबोळी, अल्लाउद्दीन शेख आदिनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.