कोयत्याच्या धाकाने खंडणीची मागणी करणारे जेरबंद

एमपीसी न्यूज : कोयत्याचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना दुकानदारांना धमकावणारे आणि खंडणीची मागणी करणाऱ्या चार जणांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. मुंढवा पोलीस स्टेशनच्या आदित्य केशवनगर परिसरात 21 नोव्हेंबर रोजी हा सर्व प्रकार घडला. आरोपींनी कोयत्याच्या धाकाने दुकानात प्रवेश करत व्यापाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

Criminal Arrested : बेटिंगसाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाचा खून; दोघा सराईतांना अटक

आकाश अनिल जाधव, सोहेल शब्बीर शेख, अनिकेत सुनील पुरी आणि आदित्य कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी व्यापारी उमाराम दुर्गाराम चौधरी (वय 43) यांनी तक्रार दिली होती.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री दहा वाजता सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या किराणा मालाच्या दुकानात शिरले. कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी पैशाची मागणी करत दुकानातील साहित्याची तोडफोड केली. तसेच फिर्यादींना ठार मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर आरोपींनी हवेत कोयता फिरून परिसरात दहशत निर्माण केली होती. आरोपी विरोधात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.