Pune – सोशल मीडियावर डीजे वाजवण्याची चिथावणी देणाऱ्या नऊ मंडळांवर कारवाई

एमपीसी न्यूज- घोरपडी येथील सोशल मिडीयावर गणेशोत्सवादरम्यान डी जे च्या वापराबद्दल चिथावणी देणा-या नऊ गणेश मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बुधवारी (दि.12) रात्री मंडळाच्या अध्यक्षांना पोलिसांनी अटक करून ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडी येथील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडुन सोशल मिडीयावर गणेशोत्सवादरम्यान डी जे च्या वापराबद्दल चिथावणी दिली जात होती. कोण आडवते पाहतोच, घोरपडीत डी जे चा राडा होणारच अशा आशयाचे मेसेज या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडुन पाठवले जात होते. त्यामुळे या नऊ मंडळाच्या अध्यक्षांना पोलिसांनी अटक करून रात्रभर पोलिस स्टेशनमध्ये ठेवले. त्यानंतर सकाळी त्यांना समज देऊन सोडण्यात आले.

न्यायालयाने डी जे च्या वापराबाबत दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी या नऊ मंडळांच्या अध्यक्षांना अटक करून त्यांनी मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आणले होते. या नऊही जणांना दर चार दिवसांनी सहाय्यक पोलीस आयुक्तांसमोर हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले असून न्यायालयाने डी जे च्या वापराबाबत दिलेल्या आदेशांचे पालन होण्यासाठी या कारवाईचा नक्कीच उपयोग होईल असे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.