आपला माणूस फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – धाराशिव येथील आपला माणूस फाउंडेशनचे संस्थापक अभिजित अरुणराव पडवळ यांनी स्थापित केलेल्या या संस्थेच्या वर्ष पूर्ती निमित्त कोविड काळात समाजासाठी कार्य केले, आपले कार्य अविरत चालू ठेवले. त्यांच्या या कार्याची दखल घेत , सामाजिक बांधिलकीतून अश्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना “कोरोना योद्धा समाजरक्षक सन्मान” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नुकताच ह्या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष युवराज विरसेन राजेनिंबाळकर ( संचालक को.ऑ.क्रेडिट मल्टिस्टेट सोसायटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना), जयवंत जयस्वाल (पोलीस निरीक्षक ,पोलीस मुख्यालय, धाराशिव) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विष्णू नरेन्द्र इंगळे – जेष्ठ समाज सुधारक, श्यामसुंदर शितोळे – आय. डी.बी. आय बँक शाखा अधिकारी, धाराशिव, डॉ.नितीन पाटील – विभाग प्रमुख -जल व भूमी व्यवस्थापन या कार्यक्रमास उपस्थित होते.

Metro News: मेट्रो मार्गिकेवरील रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण

आपला माणूस फाउंडेशन नेहमीच शेतकरी ,ग्रामीण भागातील तरुण आणि बेरोजगार वर्ग, मतिमंद ,अनाथ मुलांसाठी कार्य आणि कोवीड काळात पेशंटच्या नातेवाईकांना अन्नधान्य किट चे वितरण स्वखर्चाने करत, यांच्यासाठी पुढाकार घेऊन कार्य करत असते.

यावेळी सामाजिक कार्यासाठी सौरभ सतीश भालेराव, समिना सय्यद इरफान,रणवीर मारूती इंगळे,अजहर चांद मुजावर, काझी विखार अहमद, रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया तर एस. टी. कंडक्टर परमेश्वर श्रीकृष्ण हजगुडे, अनिल संदराव माने, ट्रॅफिक पोलीस – दत्तात्रय विरु गाडेकर, लक्ष्मीकांत मुरलीधर घातगीने, पोलिस कॉ्स्टेबल – महादेव वसंतराव शिंदे, सचिन स्वामी , वीज वितरक सेवा देणारे – तुकाराम भगवान ढेरे, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. राजेश लक्ष्मण पवार, डॉ. सुभाष वाघ, रिक्षा चालक – समाधान चोपडे, हृदयरोग आणि मधुमेह तज्ञ डॉ. धनंजय पडवळ, नगरपालिका सेवक – अजिंक्य जानराव , यांना ” कोरोना योद्धा समाजरक्षक” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पडवळ यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.