Talegaon Dabhade : ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा

एमपीसी न्युज – तळेगाव ते ग्रामदैवत डोळसनाथ महाराज यांची पालखी शुक्रवारी (दि. 18) ग्रामप्रदक्षिणासाठी छबिना पालखी काढण्यात आली. चौघडा, टाळ, मृदंग, भजनांच्या गजरात पालखीची ग्रामप्रदक्षिणा पूर्ण झाली.

या पालखी सोहळ्यात गावातील सर्व भजनी मंडळे, महिला भजनी मंडळ, गणेश मंडळ, ग्राम पुरोहीत अतुल रेडे, गुरव समाजाचे नित्य पुजारी, पालखीचे मानकरी भोई समाज, गोंधळी, डोळसनाथ तालीम मंडळ, डोळसनाथ उत्सव समिती, डोळसनाथ मंदीर ट्रस्ट व समस्त गावकरी, महिला भगिनी आनंदाने, उत्साहाने सहभागी झाले होते.

Criminal Arrested : बेटिंगसाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाचा खून; दोघा सराईतांना अटक

सप्ताहमधे सकाळी अभिषेक, महापुजा, दुपारी हरीपाठ, महिला भजन, दीपप्रज्वलन, श्रीची कालभैरवाष्टक, कीर्तने व महाप्रसाद असा कार्यक्रम झाला. शुक्रवारी ग्राम प्रदक्षिणा पुर्ण करुन मंदिरात पालखीचे आगमन झाल्यावर श्रीची आरती झाली. त्यानंतर काल्याचा अभंग म्हणून देव जन्मोत्सव निमीत्त असलेल्या अखंड हरीनाम सोहळ्याची सांगता झाली. सर्व भाविक-भक्तांना शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेश पिराजी सरोदे आणि परिवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.