Wakad Crime News : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेचे मंगळसुत्र हिसकावले. विनोदेवस्ती, वाकड येथे शुक्रवारी (दि.25) सायंकाळी 7.40 ला ही घटना घडली.

याप्रकरणी महिलेने शनिवारी (दि.26) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 392, 34 अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मैत्रिणी सोबत लक्ष्मी चौकाकडे चालत जात होत्या. त्यावेळी विनोदे कमानी जवळ अल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावले. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.