Pimpri News: शिवीगाळीच्या कारणावरुन, दोन कुटुंबियांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – दुकानाजवळ थांबून शिवीगाळ केली म्हणून लाकडी दांडक्याने घरात घूसुन एका कुटूंबाला मारहाण केली, तर शिवीगाळ का केली याचा जाब विचारायला गेल्यावर चाकुने अंगावर वार केले, म्हणून दोन कुटूंबियांनी एकमेकांविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात मारामारीची तक्रार दिली आहे. पिंपरी येथील नेहरूनगरमध्ये शनिवार (दि. 16) रोजी स. 9 वा. येथे ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तारामती शेरसिंग गोरखा (वय 62 रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर पिंपरी) यांच्या मुलाने आरोपीच्या दुकानाजवळ थांबून शिवीगाळ केली होती. म्हणून आरोपी कलीम सलीम कुरेशी वय 27, समीर कुरेशी वय 35, रियाज कुरेशी, वय 25, रेहान कुरेशी वय 27, आशिया सलिम कुरेशी वय 52, हिना कलीम कुरेशी वय 22, यांनी फि र्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घूसुन फिर्यादी यांचा नातु, मुलगी यांना शिवीगाळ करून, मारहाण केली.

तर याविरूध्द फि र्यादी कलिम सलिम कुरेशी वय 27 यांनी आरोपी प्रविण शेरसिंग गोरखा वय 40, तेजस प्रविन गोरखा वय 22, विरबहादुर नरबहादुर गोरखा वय 50, रूपेश शेरसिंग गोरखा वय 41, मनिष दिलबहादुर सोनार वय 29, पिंकुगोरखा वय 50, तारामती गोरखा 62, यांच्या विरोधात चाकुने वार केेले, अशी फि र्यादी यांनी तक्रार दिली आहे. दोन्ही तक्रारी रविवार (दि. 17) रोजी पिंपरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.