Talegaon News : दरवाजाचे कुलुप तोडून 2.21 लाख रूपये किमतीचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप तोडून पाच तोळे सोने चोरीला गेले. 16 ते 17 एप्रिल या कालावधीत इंदोरी, मावळ येथे ही घरफोडीची घटना घडली.

 

याबाबत संदीप भारत शेंडे (वय 35, रा. इंदोरी,  मावळ मुळगाव, निमगाव केतकी शेंडेमळा) यांनी एमआयडीसी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहत असलेल्या भाड्याच्या खोलीचा दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडले. चोरट्यांनी घरातून 2 लाख 21 हजार रूपये किंमतीचे पाच तोळे 05 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले. एमआयडीसी तळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.