Pune Crime News : दागिने बनविण्यासाठी सोने घेऊन गेला तो परत आलाच नाही, सराफाला 13 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने कारागिराने ज्वेलर्स व्यवसायिकाकडून तब्बल 12 लाख 92 हजारांचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना रविवार पेठेतील दुकानात घडली.

अकबर उफ अतर रफीक मलीक (वय 36 )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत घोरपडे( रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत यांचा ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडील सोने घेऊन दागिने बनविण्याचे काम अकबर काही महिन्यांपासून करीत होता. त्यामुळे अभिजीतचा अकबरवर विश्वास होता. काही महिन्यांपुर्वी अकबरने दागिने बनविण्याच्या हेतूने अभिजीत यांच्याकडून 363 ग्रॅम वजनाचे दागिने घेउन परत न देत 12 लाख 92 हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.