Police constable recruitment: पोलीस शिपाई भरतीमध्ये बँड पथकासाठी जागा राखीव ठेवण्याची महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये बँड पथकासाठी एकही जागा नसल्याने उमेदवारांसह महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या भरतीमध्ये बँड पथकासाठी जागा राखीव ठेवण्याची मागणी वंचित आघाडीचे युवक प्रदेश अध्यक्ष सागर सुखदेव जाधव यांनी केली. तसे न झाल्यास बँड मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सागर सुखदेव जाधव म्हणाले, “गेल्या 3 ते 4 वर्षात पोलीस शिपाई भरती निघाली नव्हती. यावर्षी भरती निघाली असून, त्यात पोलीस शिपाई 19956, चालक 2174, राज्य राखीव बल शशस्त्र पोलीस (एसआरपीएफ) 1201 अशी एकूण 18331 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये बँड पथकाला एकही जागा राखीव ठेवण्यात आली नाही. त्यामुळे अनेकांना यात सहभागी होता आले नाही. पुढील वर्षी वयोमर्यादेनुसार त्यांना सहभागी होता येणार नाही. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून या पदाची तयारी करीत असलेल्या गरिब व होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस भरतीमध्ये बँन्ड पथक पदासाठी जागा राखीव ठेवावी.”

Pimpri crime : माथेफिरू बस चालकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन, रागाच्या भरात केला विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ

“भरतीमध्ये बँन्ड पथकाची जागा राखीव ठेवण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांसह पक्ष-संघटना येत्या शनिवारी (दि. 10) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे कॅम्प ते जिल्हाधिकारी कार्यालय असा बँन्ड मोर्चा काढणार आहेत. विविध पक्ष-संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी आदी सहभागी होणार आहेत. मोर्चामुळे होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील. यासंदर्भातील निवेदन पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले आहे,” असे जाधव यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.