Vadgaon : लॉकडाउनच्या नियमानुसार शेतकरी आणि घरगुती ग्राहकांची वीज बिले माफ करा : भाजपची मागणी

BJP demands waiver of electricity bills of farmers and households as per lockdown rules : लॉकडाउनच्या नियमानुसार शेतकरी आणि घरगुती ग्राहकांची वीज बिले माफ करा : भाजपची मागणी

एमपीसीन्यूज : महावितरणकडून कुठल्याही प्रकारची मोजमाप न करता जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या आणि घरगुती वीज ग्राहकांच्या वीज बिलामध्ये अन्यायकारक वाढ केलेली आहे. याला भाजपचा विरोध असून, ही वाढीव वीज बिले सरकारने त्वरित मागे घेऊन लाॅकडाऊन काळातील नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना वीज बिले माफ करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे यांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संदीप काकडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव, वडगांव शहर अध्यक्ष किरण भिलारे, महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे, सरचिटणीस सुनिल चव्हाण, अनंता कुडे, संघटक सरचिटणीस कल्याणी ठाकर, सरचिटणीस अनिता सावले, उपाध्यक्ष रोहिणी गाडे, नाणे मावळ अध्यक्ष सीमा आहेर, बाबूलाल गराडे, नामदेव वारींगे, नगरसेवक दिनेश ढोरे, आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बाळा भेगडे म्हणाले, केंद्र सरकार पॅकेज देत असेल तर राज्य सरकारने एक नवा पैसा जनतेला दिला नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारने हे वीज बिल माफ करावे.

रविंद्र भेगडे म्हणाले, मागील एक महिन्यापासून तालुक्यातील अनेक गावे अंधारात आहेत. तेथील वीजपुरवठा त्वरीत चालू करावा, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.