Maval : आमदारांना मंजूर विकासकामांची बेरीज जमेना – माजी मंत्री बाळा भेगडे

तालुक्यातील विद्युत विभागाच्या कामासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांनी (Maval) तालुक्यातील विद्युतविषयक कामांसाठी पाच कोटी 62 लक्ष एवढा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री भेगडे यांनी पोलखोल करत पाच कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला नसून साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. आमदारांना मंजूर कामांची बेरीजही जमत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मागील महिन्यात तालुक्यातील विद्युत विभागाच्या कामाकरिता सुमारे 10 कोटी रुपयांची मागणी केली असता प्रामुख्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्याला 7.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सर्व कामे लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले.

Sinhagad Express News : सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेवरून महिलांमध्ये हाणामारी

मंजुर झालेल्या 7.50 कोटी निधी पैकी (Maval) श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या विद्युत कामासाठी 1 कोटी एकोणचाळीस लक्ष,अठ्ठेचाळीस हजार रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून उर्वरित निधी तालुक्यातील सोमाटणे, सांगवडे, साळुंब्रे, धानगव्हाण,उर्से, राजपुरी, कामशेत, कल्हाट, वडगाव (मावळ),ब्राम्हणोली,सांगीसे,आढे, काले, चावसर, थुगाव, कोथुर्णे बऊर, पुसाणे, ठाकुरसाई, शिळिंब, चिखलसे, नाणे,इंदोरी,उकसान,आढले,कशाळ, जांबवडे, भोयरे, जांभुळ,चांदखेड, कडधे, गहुंजे आदी गावांना निधी मंजुर झाल्याचे माजी मंत्री भेगडे यांनी सांगितले.

आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम आमदारांनी बंद करावे, आणि फुकटचे श्रेय घेण्यास घाई करू नये असे ही भेगडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.