Pune : हिंदु जनजागृती समितीतर्फे हनुमान जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात 50 हून अधिक ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. (Pune) तसेच देशभरात 800 ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. 

या वेळी शंखनादाने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, स्तोत्र आणि ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा’ करण्यात आली.

Sinhagad Express News : सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेवरून महिलांमध्ये हाणामारी

समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतीच्या ठिकाणीही गदापूजन करण्यात आले. यांसह महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर आणि अमरावती; कर्नाटकात बागलकोट, धारवाड, शिवमोग्गा, उडुपी,  (Pune) दक्षिण कन्नड, म्हैसूर, तुमकूर, बेंगळुरू आणि बेळगांव; गोव्यात फोंडा आणि साखळी; उत्तर प्रदेशात मधुरा यांसह दिल्ली आणि राजस्थान येथेही सामूहिक ‘गदापूजन’ उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमांना संतांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.