Vadgaon : ‘एक हात मदतीचा’अंतर्गत मावळातील प्रत्येक गणात जीवनावश्यक साहित्याचे वाटप : रवींद्र भेगडे

एमपीसी न्यूज ; मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत मावळ तालुक्यात जवळपास सात ते आठ हजार कुटुंबांना एक महिना पुरेल एवढा किराणामाल व जीवनावश्यकवस्तूंची मदत करण्यात आल्याची माहिती तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी दिली.

मावळ तालुक्यातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून शंभर किलो धान्य, गोडेतेल, तूर डाळ, तांदूळ, गहू, ज्वारी अशाप्रकारच्या विविध वस्तू जमा करण्यात आल्या. वडगाव येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व वस्तू एकत्रित करून त्याचे छोटे-छोटे कीट बनवण्यात आले. त्यानंतर ते गणनिहाय प्रत्येक ठिकाणी, गाव, वाडी वस्ती अशा ठिकाणी पोच करण्यात आले. या कामी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारची मदत केली.

त्याचप्रमाणे मावळ तालुका भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीच्यावतीने सुद्धा दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील उज्वला गॅसधारकांनाही तीन महिने मोफत गॅस देण्याचे काम सुरू आहे. अशा गॅस धारकांना त्यांच्या खात्यामध्ये गॅसचे पैसे उपलब्ध होत आहेत. ज्यांनी जनधन योजनेत बँकेत खाती उघडली आहेत. त्यांच्या प्रत्येक खात्यात 500 रूपये जमा झाले असल्याची माहिती रवींद्र भेगडे यांनी दिली.

भाजपच्या वतीने उर्से ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप धामणकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, नितीन घोटकुले, मावळ प्रबोधिनीचे अध्यक्ष रवींद्र शेटे, युवा नेते देवा गायकवाड, मावळ पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे, चेतन मानकर, संदीप उंबरे, मच्छिंद्र केदारी, माजी सरपंच रोहिदास आसवले, माजी उपसभापती शांताराम बापू कदम, नारायण बोडके, संघटनमंत्री किरण राक्षे, सरचिटणीस सुनील चव्हाण, शेखर दळवी, अर्जुन पठारे, गणेश धानिवले या सर्वांनी साहित्य वाटपासाठी चांगले काम केले.

मुख्य बाब म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते स्व:खर्चाने अशा प्रकारची मदत प्रत्येक गावांमध्ये करत आहेत, असे रवींद्र भेगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.