BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : मावळ तालुका खाण क्रशर उद्योजक संघाकडून पूरग्रस्तांना चार ट्रक भरून पाण्याच्या बाटल्या

एमपीसी न्यूज- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने हाहा:कार माजवला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. मात्र, या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कमी करण्यासाठी मावळ तालुका खाण क्रशर उद्योजक संघाकडून पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात म्हणून चार ट्रक भरून पिण्याच्या पाण्याच्या बॉटल पाठविण्यात आल्या आहेत.

यावेळी मावळ तालुका खाण क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे म्हणाले,”या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी व पूरग्रस्त लोकांच्या मदतीला खाण क्रशर उद्योजक संघटनेच्या तसेच रोटरीच्या माध्यमातून सर्वोपरी मदत करणार असून रोटरीच्या सर्व सदस्यांना मदतीचे आवाहन केले आहे”

यावेळी उपजिल्हा अधिकारी सुभाष बागडे, निवासी नायब तहसीलदार आर.व्ही.चाटे यांच्यासह मावळ तालुका खाण क्रशर उद्योजक संघटनेचे अध्यक्ष विलास काळोखे, उपाध्यक्ष सागर पवार, किरण काकडे, श्रीकांत वायकर, विक्रम काकडे उपस्थित होते. सदर मदत कोल्हापूर येथील विभागीय आयुक्तांच्या मार्फत पोहचवण्यात येणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like