_MPC_DIR_MPU_III

Vadgaon Maval : मिंडेवाडी, जाधववाडी येथील भजनी मंडळ यांना साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषद, पुणे यांजकडून जिल्हा परिषद सदस्य बाबुराव आप्पा वायकर यांच्या विशेष प्रयत्नातून नवलाख उंबरे येथील विठ्ठल-रखुमाई भजनी मंडळ मिंडेवाडी आणि जाधववाडी येथील भजनी मंडळ यांना भजन साहित्याचे वाटप देहू संस्थानचे विश्वस्त उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

यावेळी,गावातील विकासासाठी, वाड्यावस्त्यांना विकास निधी उपलब्ध करून देणार आहे,असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य व नियोजन मंडळ सदस्य बाबूराव अप्पा वायकर यांनी दिले.

त्याप्रसंगी सरपंच दत्तात्रय पडवळ,सरपंच विठ्ठल मोहिते,पंडीतराव जाधव, सुनील दंडेल, भाऊसाहेब ढोरे, सुहास वायकर, अक्षय रौधळ, अक्षय वायकर, स्वप्नील वाडेकर, आदिक भोसले, रमेश जाधव, ज्ञानेश्वर तापकीर, तानाजी नाणेकर,चिंधु बधाले, विलास जाधव,मारुती बधाले, अभिषेक नाणेकर, तानाजी पडवळ इत्यादी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.