Vadgaon Maval : मोरया नागरी सहकारी पतसंस्थेला कायदेशीर मान्यता

 एमपीसी न्यूज- मावळ तालुका कार्यक्षेत्र असलेल्या वडगाव मावळ मधील पहिल्या मोरया नागरी सहकारी पतसंस्थेला नुकतीच कायदेशीर मान्यता मिळाली. येत्या 1 ऑगस्टपासून संस्थेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.

दुय्यम सहाय्यक निबंधक अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र शासनाचे नोंदणी प्रमाणपत्र मोरया नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, नगराध्यक्ष मयूर ढोरे याना दिले. यावेळी नगरसेवक राजेंद्र कुडे आणि संचालक मंडळ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.