Maval : बबनराव भेगडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

उल्लेखनीय कामगिरीबद्दल गणेश काकडे, मयूर ढोरे, विलास भेगडे, नंदकुमार शेटे यांनाही पुरस्कार

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील (Maval) ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे यांना मावळ वार्ता या माध्यम संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी तळेगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष,बांधकाम व्यावसायिक गणेश काकडे यांना उद्योजक गौरव पुरस्कार,वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांना उत्कृष्ट कौन्सिलपटू गौरव पुरस्कार तर विलास भेगडे यांना पत्रकारितेतील सेवेसाठी पत्रकारीता गौरव पुरस्कार तसेच हभप नंदकुमार शेटे यांना अध्यात्मिक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे अप्पर आयुक्त महासचिव एस. बी.पाटील, येरवडा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर, रिटायर्ड पेरा कामंडो रघुनाथ सावंत, गुरुवर्य दादाजी वसंतदादा खानविलकर,सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक,सिने अभिनेते माधव अभ्यंकर,विजय पटवर्धन,मावळ वार्ताचे मुख्य संचालक संजय अडसुळे तसेच मावळ वार्ता परिवारातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना मावळवार्ता गौरव पुरस्कार -2023, देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये मावळ तालुक्यातील पुणे जिल्हाचे ज्येष्ठ नेते सहकारभूषण बबनराव भेगडे यांच्या सामाजिक, शैक्षिणिक,राजकीय,सहकार अशा विविध क्षेत्रातील कार्याबद्दल “जीवनगौरव पुरस्कार” देऊन उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Maratha Reservation : 60 वर्षे सत्तेत असलेल्या नेत्यांनी आरक्षणासाठी काय केले? – महेश लांडगे

जीवनगौरव पुरस्कार प्रसंगी सहकारभूषण बबनराव भेगडे यांच्या पत्नी शोभाताई भेगडे,चिरंजीव पुणे पीपल्स को ऑफ बँकचे तज्ञ संचालक कौस्तुभ भेगडे,स्नुषा प्रियांका भेगडे, बंधू कामगार नेते छबुराव भेगडे, पुतण्या पुणे महानगर नियोजन समितीचे विद्यमान सदस्य,तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मा नगरसेवक संतोष भेगडे यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

पुरस्कार प्रदान करते समयी सुरेल अशी भक्तीमय संगीतवाणी मैफील स्थानिक कलाकारांनी सादर करून उपस्थित श्रोते यांची मने जिंकली. (Maval) यावेळी पुणे जिल्हा कॉंग्रेस आयचे नेते किरण गायकवाड व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,लोणावळा नगरपरिषदेच्या मा नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी सहकारभूषण मा.बबनराव भेगडे यांच्या कार्याला आपल्या मनोगतातून उजाळा दिला.

या वेळी मावळ वार्ता व बबनराव भेगडे यांच्यावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.