Vadgaon Maval : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या वतीने तालुकास्तरावर शेतकरी मेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र वडगाव हेड शाखेच्या वतीने मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन हॉटेल श्रीकृष्णमध्ये करण्यात आले होते. यात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी मावळ तालुका कृषी अधिकारी उमेश चौधरी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना विविध शेतकरी कर्ज योजनेची माहिती दिली, बँक अधिकारी वसंत ठक्कर यांनी जीवन योजना, सुरक्षा विमा, अटल पेंशन, मुद्रा लोन, शैक्षणिक लोन आदी संदर्भात माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या वतीने सुधीर कुडे व विलास पिंगळे यांनी पॉलीहाऊस संदर्भात विमा रक्कम हप्ता रद्द करण्याची विनंती केली. यावेळी बँकेच्या वतीने ३कोटी रुपयांचे पीक कर्जाचे मंजुरीपत्र शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतिष परदेशी व श्री पोटोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे यांनी सर्व शाखाधिकारी यांचे तालुका व ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले.

कार्ला वडेश्वर,इंदोरी, पवना नगर,तळेगाव शाखेचे,शाखा व्यवस्थापक आणि यावेळी शेतकरी प्रविण चव्हाण, मनोज ढोरे,प्रसाद पिंगळे,रवींद्र म्हाळस्कर, विराज हिंगे, श्रीराम ढोरे,सुरेश जांभुळकर आदींसह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.