Vadgaon Maval : जनरल मोटर्स कामगारांच्या आंदोलनाला वडगाव राष्ट्रवादीचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी मधील (Vadgaon Maval) जनरल मोटर्स या कंपनीच्या कामगारांनी मागील आठवड्यापासून एमआयडीसी रोड, वडगाव येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. कामगारांच्या या आंदोलनाला वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. कंपनी हस्तांतरण प्रक्रियेत कामगारांचा प्रामुख्याने विचार करावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.

 

या वेळी मावळचे आमदार सुनिल शेळके,वडगाव शहराध्यक्ष प्रविण ढोरे, महिला अध्यक्षा पद्मावती ढोरे,माजी नगरसेवक राजेंद्र कुडे, मा ग्रा सदस्य विलास दंडेल,माजी नगरसेवक चंद्रजीत वाघमारे,माजी उपसरपंच विशाल वहिले,पोटोबा देवस्थान विश्वस्त सुनीता कुडे, युवा नेते शरद ढोरे,गणेश ढोरे आफताब सय्यद, विकी ढोरे आदी उपस्थित होते.

Chakan : मित्राने केला कारचा अपहार

मावळ तालुक्यातील तळेगांव एमआयडीसी मधील (Vadgaon Maval )जनरल मोटर्स या कंपनीच्या कामगार विरोधी धोरण व कामगारांचा विचार न करता परस्पर कंपनी हस्तांतरणाचा निर्णय या विरोधात कामगार संघटनेने मागील आठवड्यापासून साखळी उपोषण एमआयडीसी रोड वडगांव येथे सुरू केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा व कामगारांना नवीन कंपनीमध्ये सामावून घेणे या करिता वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.