Vadgaon Maval : वडगाव हे तालुक्यातील आदर्श शहर करणार- बाळा भेगडे 

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीची प्रशासकीय इमारत, पाणी योजना, शाॅपींग सेंटर, ऐतिहासिक तळ्याचे सुशोभिकरण, वीज वाहक तारा अंडरग्रांउड करणे, भुयारी गटार योजना, पाण्याचे योग्य नियोजन करणे, नाट्यगह उभे करणे आदी कामांना गती देऊन वडगाव हे तालुक्यातील आदर्श शहर करणार असल्याचे आश्वासन कामगार व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी वडगावकरांना दिले.

वडगाव नगरपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत व नगरपंचायत अनुदान योजने अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी भेगडे बोलत होते. यावेळी नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारती साठी तीन कोटी निधी तसेच दलीत वस्तीच्या विकासकामासाठी पाच कोटीचा निधी मंजूर  करुन देऊ असे आश्वासन दिले.

यावेळी मावळचे खासदार मा.श्रीरंग आप्पा बारणे आणि राज्यमंत्री मदनजी बाफना, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्करराव  म्हाळसकर, माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, ज्येष्ठ नेते मंगेश ढोरे, मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, सुभाष जाधव, सुनील चव्हाण आणि वडगावकर नागरिक तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वडगाव नगरपंचायतीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा धनादेश राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन गटनेते नगरसेवक राजेंद्र कुडे, प्रमिला बाफना, दिनेश ढोरे, प्रवीण चव्हाण, पूजा  वहीले, सायली म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, किरण म्हाळसकर, सुनीता भिलारे, शारदा ढोरे, माया चव्हाण, पूनम जाधव, दशरथ केंगले, दीपाली मोरे, सुनील ढोरे, ॲड विजय जाधव  व कर्मचारी यांनी केले.

स्वागत उपनगराध्यक्ष राहुल ढोरे यांनी तर प्रास्ताविक नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केले. सुत्रसंचालन नगरसेवक चंद्रजित वाघमारे यांनी तर आभार माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर यानी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.