Vadgaon Maval: येत्या दोन दिवसांत वडगावचा पाणीपुरवठा सुरळीत होणार- मयुर ढोरे

Vadgaon Maval: Water supply to vadgaon will be regularized in next two days- Mayur Dhore

एमपीसी न्यूज- बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे वडगाव शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना विजे अभावी बंद असल्याने वडगाव शहरात काही प्रभागात पाणी पुरवठा होत नाही. येत्या दोन दिवसात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी दिली.

वडगाव शहराला जांभुळ, सांगवी व कातवी येथील इंद्रायणी नदीतून जॅकवेलमधून पाणीपुरवठा होतो. वादळामुळे विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता.

सांगवी व कातवी येथील पाणीयोजना सुरु झाली असुन काही भागात पाणीपुरवठा सुरु झाला आहे. जांभुळ पाणीपुरवठा करणा-या योजनेचा वीज पुरवठा वादळामुळे विजेचे पोल मोठ्या प्रमाणात पडल्याने वीज पुरवठा होण्यास विलंब होत आहे.

येत्या एक दोन दिवसात वीजपुरवठा पूर्ववत सुरु झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत सुरु होणार असल्याचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी सांगितले.

नगरसेविकेकडून मोफत पाणीपुरवठा
दरम्यान, प्रभाग क्रमांक सहाच्या नगरसेविका पुजा विशाल वहिले या संकटसमयी नागरिकांच्या मदतीला धावून गेल्या. त्यांनी स्वखर्चाने आपल्या प्रभागात टँकरने नागरिकांना मोफत पाणी उपलब्ध करुन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.