Vadgaon News : महाशिवरात्री निमित्ताने भावाबहिणीच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने पहाटे पाच वाजता पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण, किरण भिलारे, चंद्रशेखर सोपानराव म्हाळसकर यांचे हस्ते अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, शासनाच्या नियमांचे पालन करून सकाळी आठ वाजता परंपरेनुसार श्री पोटोबा महाराज व सांगवी येथील जाखमातादेवी या ठिकाणी पालखी सोहळा गाडीमध्येच नेऊन जाखमाता मंदिरात भाऊ- बहिण भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी सांगवी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले नंतर तेथील पुजारी कैलास खांदवे व देवस्थानचे विश्वस्त यांच्या हस्ते श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी माता यांना इंद्रायणी स्नान करण्यात आले, नंतर देवस्थानच्या वतीने जाखमाता देवीला साडी, ओटी, खण, नारळ यांचा मान देण्यात आला. सांगवी मधील भजनी मंडळ व काकडा आरती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला व नंतर उपस्थित भाविकांना उपवासाच्या निमित्ताने फराळ प्रसाद वाटप करण्यात आला.

या प्रसंगी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, सचिव अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, विणेकरी बबन भिलारे, शंकर म्हाळसकर, पंढरीनाथ भिलारे, विठ्ठल ढोरे,देवराम कुडे, मधुकर पानसरे, हरियाली पानसरे, पुजारी मयुर गुरव पोपट चव्हाण, ज्ञानेश्वर म्हाळसकर, रविंद्र तुमकर, महादू खांदवे, मधुकर टकले, सुनिता पांडागळे आदीसह भाविक उपस्थित होते. दिवसभर मंदिर दर्शन प्रसंगी वडगांव मावळ पोलीस यांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.