Vadgaon Nimbalkar Crime News : शाळेच्या स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा पीडित मुलीच्या भावाचा मित्र आहे.

एमपीसीन्यूज : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या स्वच्छतागृहातच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा पीडित मुलीच्या भावाचा मित्र आहे. याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने पिडितेवर तीन वेळेस बलात्कार केला.

पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर गावात लॉकडाऊनच्या काळात हा प्रकार घडला. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये पीडित मुलीने फिर्याद दिली असून 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीच्या भावाचा मित्र आहे. याच ओळखीचा फायदा घेऊन त्याने हा घृणास्पद प्रकार केला.

आरोपीने तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वडगाव निंबाळकर गावातील शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

तसेच अन्य दोन ठिकाणी घेऊन जात त्याने पिडितेवर बलात्कार केला. दरम्यान पीडित मुलीच्या भावाला तिच्या रोजच्या वागणुकीतील बदल पाहून संशय आल्याने त्याने तिच्याकडे विचारणा केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.