Vande Bharat Express : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे आज होणारे लोकार्पण रद्द

एमपीसी न्यूज-ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाल्याने  मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे  आज 3 जूनला होणारे लोकार्पण रद्द करण्यात (Vande Bharat Express ) आले आहे. या अपघातामध्ये 200जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी

आज 3 जूनला मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण होते. सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नवी दिल्लीच्या कार्यालयातून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते.तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मडगाव रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहणार होते.

पण ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण रद्द करण्यात आलं आहे. अश्विनी वैष्णव ओडिशा ट्रेन अपघाताच्या घटनास्थळी गेले आहेत.भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही (Vande Bharat Express ) अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.