Ravet : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – रावेत येथील इस्कॉनच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती इस्कॉनचे गोपती दास यांनी दिली.

शनिवारी दि. २४ ऑगस्टला इस्कॉन येथील श्री गोविंद धाम येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. उद्या संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रवचन, कीर्तन, अभिषेक, नाटिका अशा कार्यक्रमाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. तरी भाविकांनी या प्रवचनांचा, आरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉन मंदिरातर्फे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.