Veer Dam : नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज : वीर धरणातून (Veer Dam) 6,954 क्यूसेक विसर्ग चालू आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा नीरा नदीकाठच्या गावांना देण्यात आला आहे. रावसाहेब सुदरीक यांनी सांगितले, कि धरण 97.1 टक्के भरले आहे. धरणाची पूर्ण साठवण क्षमता 9.83 टीएमसी आहे.

Thergaon : थेरगाव येथे सापडलेल्या चित्रबलाक पक्ष्याला पशु मित्रांनी दिले जीवदान

सांडव्यावरून 4,554 क्युसेक विसर्ग चालू आहे. डाव्या कालव्यातून 400 क्युसेक तर उजव्या कालव्यातून 1100 क्युसेक विसर्ग चालू आहे. पॉवरहाऊसमधून 900 क्युसेक विसर्ग चालू आहे. असे एकूण 6,954 क्युसेक विसर्ग चालू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी. नागरिकांनी नदीपात्रात (Veer Dam) उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.