Vehicle Theft : निगडी, पिंपरी, देहूरोड, वाकडमधून चार वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज – निगडी, पिंपरी आणि देहूरोड येथून तीन दुचाकी, तर वाकडमधून एक कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत बुधवारी (दि. 20) संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

आशिष संजय पारकर (वय 28, रा. विवेक नगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पारकर यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी 8703) चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पिंपरी पोलीस ठाण्यात विकी चंद्रकांत बाम्हणे (वय 26, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी व्ही 0957) अज्ञात चोरट्यांनी टाटा मोटर्स कंपनीच्या पार्किंग मधून चोरून नेली आहे.

देहूरोड मधील मेन बाजारात असलेल्या दर्पण बंगलो या कपड्याच्या दुकानासमोरून चोरट्यांनी 35 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी एम 4725) चोरून नेली आहे. याबाबत सतीश दबाजी शेटे (वय 44, रा. देहूरोड) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानासमोर पार्क केलेली 50 हजारांची मारुती अल्टो कार (एम एच 12 / डी एस 2605) चोरट्यांनी चरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत आकाश शरद अमोलिका (वय 39, रा. मांजरी रोड, मांजरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.