Vehicle Theft : पिंपरी, चाकणमधून दोन दुचाकी तर भोसरी मधून कार चोरीला

एमपीसी न्यूज – शहरातील वाहन चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. दरोरोज वाहनचोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. शनिवारी (दि. 30) तीन वाहनचोरीचे प्रकार उघडकीस आले. पिंपरी आणि चाकण मधून दोन दुचाकी तर भोसरी मधून एक कार चोरट्यांनी चोरून नेली आहे.

प्रमोद शिवाजी गायकवाड (वय 23, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांची चार लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार (एम एच 12 / क्यू डब्ल्यू 4519) अज्ञात चोरट्यांनी गायकवाड यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार शनिवारी (दि. 30) रात्री एक ते सकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

प्रवीण प्रभाकर प्रधान (वय 22, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रधान यांची 30 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 14 / डी बी 2489) अज्ञात चोरट्यांनी लालटोपी नगर, मोरवाडी येथील कृष्णा रेडीमेड स्टोअर समोरून चोरून नेली. हा प्रकार 8 जानेवारी रोजी दुपारी एक ते रात्री अकरा वाजताच्या कालावधीत घडला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

रामकिशन मुसी गुप्ता (वय 40, रा. खराबवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुप्ता यांची 15 हजारांची डिस्कव्हर दुचाकी (एम एच 15 / सी आर 5034) माणिक चौक, चाकण येथील भाजी मंडई येथून चोरून नेली. हा प्रकार 28 जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते पावणे सात या कालावधीत घडला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.