Veteran actor Shrikant Moghe passes away : आपले मोघे काका गेले रे !!!!!!             

एमपीसी न्यूज : ( हर्षल आल्पे ) आता सकाळी तो फोन येणार नाही , आला तरी तो आवाज त्या फोन पलीकडचा नसेल च , हेच जास्त बोचणारे आहे , “हॅलो , श्रीकांत मोघे बोलतोय” असा काकांचा तो पहाडी आणि तयार आवाज आता ऐकू येणार नाही , पण ! तो आवाज आता कानातून मनात खोलवर रूतलेला आहे .. आणि काकांनीच तो माझ्यासारख्या अनेको लोकांच्या मनात तो रुजवलेला आहे .

खर तर काका आमच्या पेक्षा फार मोठे वयाने आणि अनुभवाने तर फार च समृद्ध, पण ! एखाद्या गोष्टी ला प्रोत्साहन द्यावं ते ही काकांनीच, मग ते अगदी आमच्या एखाद्या मित्राने नवीन तयार केलेला नाटकातला उतारा असू दे , किंवा मी लिहिलेली एखादी संहिता, जिचा प्रयोग मला करायचा आहे,

आणि काकांकडे मार्गदर्शनासाठी जायच आहे, फक्त इच्छा बोलून दाखवल्यावर देव प्रसन्न होतो, याचे प्रत्यंतर म्हणजे मोघे काकांना कधी ही फक्त एवढे बोलून बघायचे, की काका, नवीन काही लिहिले आहे, तुम्हाला वाचून दाखवायची इच्छा आहे, लगेच समोरून प्रश्न असायचा रादर आज्ञा च असायची की कधी ही ये, आणि आम्ही तडक त्यांच्या कडे पोहोचायचो च ! आणि मग अनुभवाच्या एका खजिन्याच्या गुहेत आम्ही प्रवेश करायचो

…कुठलाही अभिनिवेश अथवा आव न आणता काका तल्लीन होऊन ती संहिता ऐकायचे , आणि मग अगदी प्रेमळ पणे “ अस केलंस तर ???? म्हणजे बघ हां !!छान वाटेल” अस सांगायचे , आणि प्रयोग कुठे करणारेस ? काय आहे पुढचे अस विचारायचे आणि लगेच प्रयोगाला यायची तयारी ही सुरू करायचे , आणि मग काका आपल्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही ही उत्साहाने तयारी ला लागायचो,

एक वेगळाच आत्मविश्वास मिळायचा, कधी कधी फार च त्यांना आवडली संहिता ,तर म्हणायचे मला एक प्रत देऊन ठेव, मी एकदा पुनश्च वाचतो, माझ्या शैलीत ..आणि आम्ही आनंदाने त्यांना ती द्यायचो , तर दुसर्‍या दिवशी सकाळी बरोबर 8 वाजता त्यांचा फोन असणार च, की आज ये , आपण अजून या संहिते वर बोलूया ,

त्यांना अजून अजून गोष्टींवर लेखकाचे मन जाणून घ्यायचे असायचे , (हे त्यांनीच मला एकदा सांगितले होते ) नटाने लेखकाचा आत्मा ओळखल्याशिवाय तो त्या भूमिकेच्या जवळ जाऊ शकत नाही , भूमिकेतील प्रत्येक शब्द हा नटाने आपलासा करून घेऊन च तो सादर करावा , या वर त्यांची मनापासून श्रद्धा ,नटाने एक च एक भाषा पकडून न ठेवता अनेको भाषा आत्मसात करून वेगवेगळ्या कलाकृती सादर करण्याचा ध्यास घ्यावा , असे मोघे काका आम्हाला नेहमी बजावत …

_MPC_DIR_MPU_II

वाक्यांमध्ये , शब्दांमध्ये ,जिथे गॅप असते तिथे त्या रिकाम्या जागेचा तुम्ही कसा उपयोग करता यावर तुमचे अभिनेते पण अवलंबून असते , असे मोघे काका नेहमीच सांगायचे , त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना 90 व्या वर्षी सुद्धा तारुण्यात आणि उमेदीत केलेली असंख्य नाटके तोंडपाठ असायची , म्हणजे अगदी प्रयोगातील बारकाव्यांसह  ते बसल्या बसल्या सादर करू शकायचे , रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा ,

नाथ हा माझा , लेकुरे उदंड जाहली , तुझे आहे तुजपाशी ,पुलं देशपांडे यांचे वार्‍यावरची वरात अशी अनेक विविध नाटके ते आम्हाला करून दाखवायचे , याच कारण आम्ही ती पाहिलेली नसायची , आम्ही लहान आहोत आणि आम्ही ती नाटक वाचली पाहिजेत , दर्जेदार कलाकृतींपासून आम्ही लांब राहू नये म्हणून , नवीन पिढीला साहित्याच्या आणि संस्कृती च्या जवळ घेऊन जाणारी व्यक्ति होते मोघे काका …

त्यांना संगीताची जाण होती हे सर्वश्रूत आहेच , गजल्स , ठुमर्‍या , चिजा , नाट्य गीते , भाव गीते यातले बारकावे ही त्यांना माहीत होते , त्यांनी आत्मसात ही केले होते ,प्रसंगानुरूप संगीत हा तर त्यांचा हात कंडा विषय , त्यावर भरभरून बोलायचे आपले श्रीकांत मोघे काका …..

खरच आज त्यांच्या बद्दल लिहिताना काय लिहू , किती लिहू अस होतय , लिहिताना आता ते नाहीत ही जाणीव बोचतीये , कारण सवयी प्रमाणे त्यांना वाचून दाखवाव अस वाटते आहे , पण ????

पण ते असणारेत आमच्याबरोबर , जेव्हा जेव्हा काही नवीन सादर होईल तेव्हा तेव्हा काकांचा तो हसरा चेहेरा आणि औत्सुक्याने भारलेले ते डोळे नेहमीच आमच्या समोर येऊन आम्हाला हुरूप देऊन च जातील …

श्रीकांत मोघे काका या छोट्याश्या लेखकाकडून आणि या तुमच्या चाहत्यांकडून तुम्हाला मानाचा मुजरा , आणि भावपूर्ण साश्रू भावांजली …………….

धन्यवाद …..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.