Pimpri Crime News : सराईत गुन्हेगार तुळशीराम पोकळे व योगेश सावंत टोळीवर मोक्का 

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगार तुळशीराम पोकळे व योगेश सावंत टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोकळे टोळी वर विविध नऊ गुन्हे तर, सावंत टोळीवर एकुण 13 गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाणे हद्दितील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख तुळशीराम नथुराम पोकळे (वय 34, रा. हिना पॅलेस, नढेनगर, पिंपरी) व त्याचे साथीदार दिपक धरमवीरसिंग चंडालिया (वय 34, रा. एच.ए. कॉलनी, पिंपरी), उमेश सुधीर मोरे ( वय 28, रा. नवले निवास, काटे पिंपळे, पिंपळे सौदागर), सागर दत्तात्रय पतंगे (वय 28,

रा. बारामती), प्रविण नवनाथ सोनवणे (वय 22, इंदापुर, पुणे), कपील ग्यानचंद हासवानी ( वय 30, रा. रहाटणी रोड, पिंपळे सौदागर), राकेश राजकुमार हेमनानी (वय 27, रा. पिंपरी, पुणे) प्रभु अडप्पा पुजारी ( रा. चिखली ) या टोळीवर खंडणी, वाहन चोरी, जबरी चोरी, खुन व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे एकुण नऊ दाखल आहेत.

तसेच, चिखली पोलीस ठाणे हद्दितील सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख योगेश दिनेश सावंत (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे) व त्याचे साथीदार आकाश प्रकाश भालेराव ( वय 21, रा. चिंचेचा मळा, त्रिवेणीनगर), रुपेश प्रकाश आखाडे (वय 23, रा. त्रिवेणीनगर ) नकुल अनिल कुचेकर (वय 25, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) गौरव रमेश डांगले (वय 22, रा. जुना जकातनाका, चिंचवडगाव), अर्जुन महादेव गोपाळे (वय 26, रा. शिरगाव खळवाडी ता.मावळ), किरण अरुण लोखंडे ( वय 27, रा. शिरगाव ता. मावळ), सुदिश सुरेंद्रन सदानंद ( वय 28, रा. सुखवाणी प्लाझा, आकुर्डी), सुचेतन सदाशिव चौधरी ( वय 28, रा. वाल्हेकरवाडी ) या टोळीवर खुन, खुनाचा प्रयत्न, दंगा करुन दुखापत, दुखापत, गर्दी-मारामारी व बेकायदेशीर रित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे अशा प्रकारचे एकुण 13 गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

आरोपी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दोन्ही टोळ्यांविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील 8 टोळ्यांमधील 56 सराईत गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.